प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यातील MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा उद्रेक झाल्यांनतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परीक्षेची तारीख जाहीर असल्याचं गुरुवारी संध्याकाळी केलेल्या संबोधनात सांगितले. मात्र हे सांगत असताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीवर उद्धव ठाकरे यांनी प्रकाशझोत टाकला. आज तारीख जाहीर होऊन येत्या ८ दिवसात हि परीक्षा होईल, असं मुख्यमंत्र्यानी सांगितलं. त्यांनतर आता परीक्षेची कोणती तारीख घोषीत होते? याकडे च्या विद्यार्थ्यांसह संपूर्ण राज्याचे डोळे लागलेत.
राज्यातील MPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यभरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळालं होतं. सर्वाधिक पुण्यात विद्यार्थी आंदोलनाचा जोर पाहायला मिळाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केलेल्या संबोधनात मोठी घोषणा केली. MPSC पूर्व परीक्षेची नवी तारीख शुक्रवारीच म्हणजेच आज जाहीर होईल आणि परीक्षा येत्या ८ दिवसांच्या आतच होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.