संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
“म. गांधी विद्यालय ईंटरॅक्ट क्लबऑफ डोंबिवली मिडटाऊन” ह्या क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा कु. योगिनी वडनेरे व कार्यकारिणी यांचा पदग्रहण सोहळा दिनांक १५ जुलै, २०२१ रोजी “झूम माध्यमाद्वारे” संपन्न झाला. आजच्या ह्या पदग्रहण सोहळ्याला डिस्ट्रिक्ट एव्हेन्यु चेअर रो. सेनेक्ट बालन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहीले व त्यांनी सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे, शिक्षक वृंदाचे, क्लब युथ डायरेक्टर डाॅ.मनोहर अकोले ह्यांचे कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन केल्याबद्दल विशेष कौतुक केले. मावळती अध्यक्षा कु. प्राची बागवे हिने टाळेबंदी असूनही केलेल्या कामांचा आढावा घेतला, तसेच नवनिर्वाचित अध्यक्षा कु.योगिनी वडनेरे व सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षा कु.योगिनी वडनेरे हिने येत्या वर्षांत ठरवलेल्या शैक्षणिक, वैज्ञानिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. पालकत्व असलेल्या रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे अध्यक्ष रो.जितेंद्र नेमाडे ह्यांनी क्लब संचालित रोटरी हेल्थ सेंटर मार्फत माफक दरात दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवांची माहिती दिली व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ. अकोले ह्यांनी गत इतिहासाची उजळणी मांडली व सर्वांचे विशेष कौतुक केले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन व रूपरेषा आखण्यास शाळा शिक्षिका सौ. प्रिया जोशी, श्री.ऊल्हास झोपे सर ह्यांनी विशेष मेहनत घेतली, तसेच ह्यासाठी मुख्याध्यापक श्री.आहेर सर ह्यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सलोनी मोहिते व कु.सलोनी बने ह्यांनी चोखपणे केले. कु.प्रियंका म्हात्रे हिने आपल्या मधुर आवाजात ईश स्तवन व स्वागत गीत सादर केले. कु.सलोनी मोहिते हिने आभारप्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता कु.सायली कान्हेरे हिने संत ज्ञानेश्वर रचित पसायदानाने केली.
कार्यक्रमास मिडटाऊनचे भावी अध्यक्ष रो.अजय कुलकर्णी, सचिव रो.अतुल कुवळेकर, मा. अध्यक्ष ऍड.कैलाश सोनावणे, माजी अध्यक्ष रो. डाॅ.राज शेरे, रो.गुलाब पवळे, रो.संजय पाटील, सार्जंट रो.किशोर अढाळकर, रो. डॉ.तेजल थोरवे व रो. डाॅ. प्रियदर्शिनी जोशी आणि रो. सौ. योगिता सोनावणे ह्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. “झूम माध्यमाद्वारे” संपन्न झसलेल्या पदग्रहण सोहळ्याला एकूण ५३ जण उपस्थित होते.