Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

कोकण रेल्वेमार्गावरील ‘तेजस’ एक्सप्रेस धावणार अत्याधुनिक ‘विस्टाडोम’ कोचसह..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १५.०९.२०२२ पासून मुंबई ते करमाळी दरम्यान चालविण्यात येणारी ‘तेजस एक्सप्रेस’ आता एका विस्टाडोम कोचसह धावणार आहे. या कोच सोबत धावणारी कोकण रेल्वे मार्गावरील ही दुसरी गाडी ठरली आहे. ह्या आधी मुंबई ते मडगाव दरम्यान रोज चालविण्यात येणारी ‘जनशताब्दी एक्‍स्प्रेस’ या विस्टाडोम कोच सह चालविण्यात येत होती. विस्टाडोम कोच साठी प्रवाशांच्या प्रतिसादामुळे हा डबा ‘तेजस एक्सप्रेस’ला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्या गाडीतील विस्टाडोममध्ये एका डब्यात ४० प्रवासी असणार आहेत.

गाडीचा मडगाव जंक्शन पर्यंत विस्तार

तसेच ही गाडी मडगाव जंक्शन पर्यंत विस्तारित करण्यात आलेली आहे. १ नोव्हेंबर २०२२ पासून करमाळी ऐवजी मडगाव पर्यंत धावणार आहे. तर ही ट्रेन दर मंगळावार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार धावणार आहे. मडगावहून मुंबईला देखील ही ट्रेन याच दिवशी परत येणार आहे.

कसा असतो विस्टाडोम कोच ?

विस्टाडोम हा प्रशस्त आणि खास डब्बा असतो. वातानुकुलित असणार्‍या या डब्यामध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे. काचेच्या प्रशस्त खिडक्या आणि छत आहे ज्यामुळे डोंगर-दर्‍यांचे विहंगम दृश्य या कोचमध्ये बसून आरामात टिपता येते.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *