संपादक: मोईनसय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल आज शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे.
इयत्ता १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १२ मे रोजी राज्य सरकारनं इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इयत्ता १० वीच्या निकालासाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली होती. यासाठी १० जून रोजी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण व वेबिनार आयोजित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून इयत्ता १० वीचा निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. त्यानुसार आज दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
दहावीचा निकाल कुठे पाहणार ?
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com
या वेबसाईट्स वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.
निकाल कसा पाहाल ?
- निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
- त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
- त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
- त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.
- यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.