मराठवाडा

ग्रामीण महिलांच्या प्रश्नांवर संशोधन होणे ही खरी गरज! – धर्मराज हल्लाळे

बबलू कदम, वडवणी प्रतिनिधी : ग्रामीण महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबतच्या समस्या अजूनही शासन, प्रशासन आणि माध्यमांच्या परिघाबाहेर आहेत, त्यावर शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी अधिक गांभीर्याने संशोधन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन दैनिक लोकमत लातूरचे वृत्तसंपादक श्री. धर्मराज हल्लाळे यांनी केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ के एम पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात कोरोना काळात महाविद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. पंजाबराव मस्के पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रस्तुत महाविद्यालयाच्या स्थापनेमागील ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय हीच प्रमुख भूमिका असल्याचे सांगितले आणि महाविद्यालयाची आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीबद्दल गौरवोद्गार काढले.

या वेबिनारच्या बीजभाषक म्हणून डॉ बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील ताराबाई शिंदे स्त्री अध्यासन केंद्राच्या संचालिका डॉ. निर्मला जाधव यांनी स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर प्रखर प्रकाश टाकून शासन, प्रशासन आणि माध्यमांच्या पुरुषप्रधान मानसिकतेत बदल होण्याची गरज व्यक्त केली.
याप्रसंगी संसाधन व्यक्ती म्हणून जी बी पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, उत्तराखंड येथील डॉ. रितू सिंग यांनी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण देण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या प्रतिबंध, मनाई आणि निवारण कायदा 2013 ‘यांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी दुसऱ्या संसाधन व्यक्ती श्रीमती अशिमा सिंग, माजी संचालिका,भारतीय रेल्वे तंत्रज्ञान आणि परिवहन संस्था, गोरखपूर यांनी भारतीय साहित्यामध्ये रेखाटलेले स्त्री चित्रण यांवर प्रकाश टाकला.
या वेबिनारचे सूत्रसंचालन महाविद्यालयालयीन विशाखा समितीच्या समन्वयक डॉ. मनिषा ससाणे यांनी केले तर डॉ. बी. जी. कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक- विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *