Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

“घरोघरी तिरंगा” अभियानाच्या जनजागृती साठी आयोजिलेल्या शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीस मोठ्या जल्लोषात उत्स्फुर्त प्रतिसाद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, “घरोघरी तिरंगा” या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पोलिस प्रशासन, महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये यांचे संयुक्त विदयमाने आज आयोजिलेल्या प्रभातफेरीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कल्याणमधील या रॅलीचा प्रारंभ बिर्ला महाविद्यालय येथून महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे,अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रेय शिंदे, परिमंडळ-३ चे उपआयुक्त सचिन गुंजाळ, आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, बिर्ला महाविद्यालयाचे डॉ. नरेशचंद्र, महापालिका सचिव संजय जाधव, उपायुक्त अर्चना दिवे, वंदना गुळवे, स्वाती देशपांडे, पल्लवी भागवत, अतुल पाटील, शिक्षण विभागाचे उपायुक्त अनंत कदम, वाहतूक विभागाचे सहा.आयुक्त उमेश माने पाटील, महापालिकेच्या सहा. आयुक्त स्नेहा करपे, शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि त्यांचे‍ शिक्षण व क्रिडा विभागाचे सहकारी, संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी, इतर मान्यवर,असंख्य नागरिक यांचे उपस्थितीत झाला.

कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजपासून या रॅलीची सुरुवात होवून सुभाष मैदान येथे या रॅलीची सांगता झाली. डोंबिवलीतही अशा प्रकाराच्या रॅलीचा शुभारंभ सावळाराम क्रिडा संकुल येथुन झाला आणि फतेआली शाळा येथे या रॅलीची सांगता झाली. विद्यार्थ्यांनी, शाळांमधील शिक्षकांनी आपल्या वेशभूषेव्दारे विविध राज्यांच्या संस्कृतीचे मनोहारी प्रदर्शन आज या रॅलीच्या माध्यमातून सादर केले आणि “विविधतेतून एकता” या उक्तीचे यथार्थ दर्शन घडविले. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून तिरंग्याची प्रतिकृती पोशाखात साकारण्यात आली होती. पारंपारिक महाराष्ट्राची ओळख दर्शविणारे लेझीम, ढोल ताशाने उपस्थितांची मने जिंकून घेतली. मुसळधार पावसाची तमा न बाळगता हजारो विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, सामाजिक संस्थांच्या प्रतिधिनींनी, नागरिकांनी अतिशय उत्साहात या रॅलीत सहभागी होऊन आपल्या देशभक्तीची प्रचिती दर्शविली. कल्याणमध्ये सुमारे ४००० व डोंबिवलीमध्ये सुमारे ३००० जणांची ही प्रभातफेरी अतिशय नियोजनबध्द पध्दतीने, वाहतूकीवर नियंत्रण ठेवत पार पडली.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published.