संपादक: मोईन सय्यद / ठाणे, प्रतिनिधी
सध्या कोरोना संकटात समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी वैयक्तिक पातळीवर विशेष प्रयत्न म्हणून सरस्वती सेकंडरी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून आईची सावली ह्या बालक आश्रमास वस्तरुपात मदत करण्यात आली.
टिटवाळा येथील आईची सावली ह्या बालक आश्रमात सुमारे 30 बालके असुन ह्या माध्यमातून त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी हा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे.
‘विद्या विनयेन शोभते’ हे सरस्वती सेकंडरी स्कूलचे ब्रीदवाक्य उपक्रमशील सामजिक कृतीतून माजी विद्यार्थ्यांनी खरया अर्थाने सार्थ केले.
ह्या सामजिक उपक्रमात चिन्मय, गौरी, सर्वज्ञा, करुणा आणि श्रीकल ह्यांनी सढळहस्ते मदतीचा हात पुढे केला.
ह्या मदतीतून 30 बालकांना किमान 2 महिने पुरेल इतका जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. संस्थेच्या संस्थापक श्रीमती. दीपाताई ह्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.