Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

माजी आमदार विनायक मेटेच्या यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांच्या कारचालकाला अटक..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कारचालकाला अटक करण्यात आली आहे. एकनाथ कदम असे या कार चालकाचे नाव आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले होते. त्यानुसार या अपघाताची सीआयडीकडून चौकशी सुरू होती. चौकशीत विनायक मेटेंची गाडी ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्यात आले. याशिवाय तज्ज्ञांची एक समिती तयार करून त्यांच्याकडूनही याप्रकरणी मते घेतली गेली.

या सर्व तपासातून ड्रायव्हर दोषी असल्याचे समोर आले आहे. अपघात चालकाने अतिवेगाने गाडी चालवल्यामुळे तसेच वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे हा अपघात झाल्याचे सीआयडीच्या चौकशीत समोर आले. यामुळे चालक एकनाथ कदम विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी एकनाथ कदम याला अटक करण्यात आली आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *