संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असतानाच अतिशय महत्वाची बातमी समोर आली आहे. आज मंगळवारी (दि. ३१) रोजी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोल डिलर्स असोसिएशन यांच्या विविध मागण्यांसाठी पेट्रोल पंपचालकांनी आज देशव्यापी इंधन खरेदी बंद आंदोलन पुकारले आहे.
आज होणार्या या आंदोलनात राज्यातील ६ हजार ५०० तर नाशिक जिल्ह्यातील सुमारे ४५० पेट्रोलपंप चालक सहभागी होणार आहेत. केवळ आजच्याच दिवशी पेट्रोलपंप चालकांकडून इंधन खरेदी केली जाणार नाही. ग्राहकांच्या सुविधेकरिता पंपावर साठा उपलब्ध असेपर्यंत त्यांची विक्री जाणार असल्याचे संघटनेमार्फत जाहीर करण्यात आले आहे.