अवधूत सावंत, प्रतिनिधी : वसई-विरार शहरात एकापाठोपाठ एक अशा आगीच्या घटना समोर येत आहेत.
दुपारी वसई पूर्व भागात वाळीव पोलीस ठाण्याच्या समोर उभा करण्यात आलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली.
या आगीत मोठ्या प्रमाणात वाहने जळून खाक झाली आहेत.
वसई पूर्व भागात वाळीव पोलीस ठाणे परिसर आहे.
या पोलीस ठाण्याच्या समोरच जप्त केलेली व अपघातांमधील काही वाहने ठेवण्यात आली होती.
दरम्याना भर दुपारी या वाहनांनी पेट घेतला.
एका पाठोपाठ एक अशी ही वाहने उभी करण्यात आलेली असल्याने आग पसरत गेली व मोठा भडका उडाला.
घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
आगीची तीव्रता अधिक असल्याने या आगीत जप्त केलेली जवळपास ३५ वाहने जळाली.
आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकले नाही. पुढील तपास सुरू आहे.