संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
ठाण्यात मोबाईल चोरांमुळे रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. हि घटना ठाण्यातील तीन हात नाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मोबाईल चोरांना अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, सदर महिला हि ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये कामाला होती. ती मैत्रिणीसोबत घरी जाण्यासाठी निघाली. त्यांनी मॉलजवळील रिक्षा थांब्यावरून रिक्षा पकडली. रिक्षा तीन हात नाका येथे आली असता, मागून दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी सदर महिलेच्या हातातील मोबाइल खेचला. त्यावेळी तोल जाऊन ती महिला रिक्षातून खाली पडली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मैत्रिणीने तिला रुग्णालयात नेले. मात्र, उपचाराआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून दोन्ही मोबाईल चोरांना अटक केली.