संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची तस्करी करून वाहतूक करणाऱ्या तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखा, बोईसर विभाग पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीत पारनाका, ता. डहाणू, जि.पालघर येथे पोलीस संशयित वाहनांची तपासणी करत होते. तपासणी दरम्यान, एका टेम्पोमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाचा माल मिळून आला.
सदरचा माल हा मानवी आरोग्यास अपायकारक आहे व त्यावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध घातलेला आहे हे माहित असतानाही शासकीय आदेशाची अवहेलना करून यातील ३ इसम हे तंबाखूजन्य पदार्थाचा माल विक्री करण्यासाठी वाहतूक करून घेऊन जात असताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून तंबाखूजन्य माल आणि टेम्पो असा एकूण रुपये २१,८,८९६/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.