Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद डावलत शिवसेनेला धक्का देत एकनाथ शिंदे गटाकडून सेनेची ‘नवी राष्ट्रीय कार्यकारणी’ जाहीर..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्याचं बदललेलं राजकारणाचं समीकरण बघता, शिंदे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत झालं आहे. मुख्य म्हणजे आमदार एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीला सेनेच्या बऱ्याच आमदारांनी पाठिंबा दिला. परिणामी सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदेनी सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. आता महाराष्ट्रात सत्ताबदल होऊन जवळपास १५ दिवस उलटून गेले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काल दुपारी मुंबईतील ‘ट्रायडेंट हॉटेल’ मध्ये पक्षाच्या पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांची बैठक झाली. अशातच, नवनवीन बदल, तसेच धोरण शिंदे गट अवलंबत असतानाच महत्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली असून त्यात शिंदे यांना मुख्य नेता करण्यात आले आहे. त्यात या नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला गटाचे सर्व आमदार आणि दिल्लीतून दहा खासदार आभासी पद्धतीने सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे, स्वत: एकनाथ शिंदेंनीच शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त केली आहे. यावेळी शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवडही करण्यात आली आहे. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची नियुक्ती केली आहे. सेनेच्या उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील आदींची नेमणूक करण्यात आली आहे.

रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीत दाखल होत असून तिथे खासदारांची प्रत्यक्ष बैठक घेतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय निवडणूक आयोगाची भेट घेऊन आपला दावा सादर करणेही अपेक्षित आहे. २० तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीबाबतही ते संबंधितांशी चर्चा करतील. याशिवाय राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर ही चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं म्हणजे, अद्याप तरी शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख पदाला हात लावलेला नाही. मात्र आमदारांचा विषय न्यायप्रविष्ठ असतानाही एकनाथ शिंदेंनी नवी राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केल्यामुळे ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. आता यावर उद्धव ठाकरे यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *