भाईंदर, उत्तन, प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून उत्तन मधील पाली उत्तन व चौक येथील अनेक मच्छिमार संस्थानी पत्र व्यवहार व पाठपुरावा करून सुद्धा उत्तन, वसई, खोचिवडे, नायगांव व भाईंदर बंदरातील मासेमारी नौकाना समुद्रात येण्या जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील दिपस्थंभाचे काम सरकारी दफतर दिरंगाई मुळे फाईलमध्ये अडकून पडले होते, परंतु ठाणे बेलापूर मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांनी याची दखल घेऊन बाबत स्वतः संबंधीत अधिकारऱ्याबरोबर चर्चा करून त्यांनी हा दिपस्थंभ तात्काळ आणि आधुनिक पद्धतीचा बांधून या ठिकाणी होणारे अपघात थांबवावे व मच्छीमाराना दिलासा द्यावा अशी मागणी केली. खासदार राजन विचारे यांनी मागणी केल्या नंतर सदर दिपस्थंभाच्या कामाला आता गती मिळाली असून भाईंदर पूर्वेकडे या दिपस्तंभाचे काम आता प्रत्यक्षात सुरू झाले आहे.
भाईंदर पूर्व येथे वरील दिपस्थंभाचे काम सुरू झाले असून तिथे तयार झाल्यानंतर हा दीपस्तंभ मोठ्या ड्रेजरने आणून वरील ठिकाणी ड्रीलिंग करून बसविण्यात येणार आहे, गुरुवारी 04 फेब्रुवारी रोजी मेरिटाईम बोर्डाचे अभियंता मेंटकर, त्यांचे सहकारी अभियंता प्रवीण पाटील व कंत्रातदाराचे सहाययक जयशंकर हे या कामाची पाहणी करण्यासाठी उत्तन परिसरात आले असताना शिवसेनेचे शहर प्रमुख बर्नड डिमेलो, स्थानिक नगरसेविका शर्मिला गंडोळी व इतर मच्छिमार संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या दिपस्तंभाचे काम पूर्ण झाल्यानंतर उत्तन, वसई, खोचिवडे, नायगांव व भाईंदर बंदरातील मासेमारी नौकाना समुद्रात येण्या जाण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी मदत होईल व त्यामुळे येथे मच्छीमार नौकांचे होणारे अपघात कमी होतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.