Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत


  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ८ ग, ५ ड व १ अ प्रभागातील इमारतींच्या व चाळींच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई !
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली ८ ग प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी डोंबिवली पूर्व विभागीय कार्यालयाच्या बाजुला हजेरी शेडसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर उपाध्याय यांचे तळ +३ मजली आर.सी. सी. इमारतीचे चालू असलेले अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. सदर कारवाई ६ फ प्रभागाचे सहा आयुक्त किशोर शेळके, फ व ग प्रभागाचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलीस अधिकारी व १ पोकलेन, १ जेसीबी, ४ ब्रेकर व १ गॅस कटर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे विभागीय उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ५ ड प्रभागाच्या सहा.आयुक्त सविता हिले यांनी कल्याण पूर्व हरिभाऊ पावशे पाडा, काटेमानिवली येथील जगबहादूर यादव यांचे तळ +१ मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलीस कर्मचारी, कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी व हातोडयांच्या मदतीने करण्यात येत आहे.

१ अ प्रभागातही सहा.आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी विभागीय उपआयुक्त अर्चना दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदरपाडा येथील १४ खोल्यांच्या जोत्यांचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली. सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व १ जेसीबीच्या मदतीने करण्यात आली.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *