संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
राज्यात राष्ट्रपती पदासाठी आज झालेल्या मतदानात एकूण २८८ पैकी २८३ आमदारांनी मतदान केले. उर्वरित पाचपैकी चार जण मतदान करू शकले नाहीत तर एकाचे निधन झाले आहे.
आज विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या मतदानात एकूण २८८ पैकी २८३ जणांनी मतदान केले. शिवसेनेच्या रमेश लटके यांचे निधन झाले आहे तर राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत, शिंदे गटाच्या महेंद्र दळवी यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने तर भाजपाच्या लक्ष्मण जगताप आजारी असल्याने त्यांना मतदान करता आले नाही. काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी नियमबाह्य पद्धतीने मतदान केल्याचा आक्षेप भाजपाच्या बबनराव लोणीकर यांनी घेतला आहे.