Latest News गुन्हे जगत

लोणावळ्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी 40 वर्षीय आरोपीस अटक

अवधूत सावंत, प्रतिनिधी : लोणावळा शहरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी ४० वर्षीय इसमास अटक केली आहे. आरोपी सुरज दिगंबर कारंडे (वय ४०, सध्या रा. निसर्ग नगरी सोसायटी, लोणावळा मूळ रा. कैलास नगर लोणावळा) हा त्यांच्या घरात भाडे तत्वावर राहणाऱ्या अनुसूचित जातीतील एका तेरा वर्षीय मुलीवर गेल्या एक वर्षापासून लैंगिक अत्याचार करत असल्याची फिर्याद मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस स्टेशनला दिली आहे.

सदर फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये गु. र. नं. ३३/२०२१. IPC कलम ३७६ (२) (एन), बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ चे कलम ४,८,१२, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३ (१) (डब्ल्यू ) (१) (११), 3 (२) (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पो.अधीक्षक नवनीत कॉवत, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जयराज पाटणकर, पोलीस कॉन्स्टेबल माणिक अहिनवे, अजीज मेस्त्री आणि सागर धनवे यांनी आरोपी सुरज कारंडे याला अटक केली आहे.

सदरच्या गुन्ह्यास अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा लावण्यात आल्याने गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे स्वतः करीत आहेत.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *