संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कल्याण-डोंबिवली येथील शिवसेनेचे लोकप्रिय खासदर डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि शिवसेना डोंबिवली शहर शाखा यांच्या वतीने गणेशोत्सवा निमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविक चाकरमान्यांसाठी ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली येथून मोफत एसटी सेवा पुरवण्यात आली आहे.
या एसटी बसेसना सायंकाळी चार वाजता शिवसेनेचे लोकप्रिय खासदर डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे झेंडा दाखवून मार्गस्थ करणार आहेत. या एसटी गाड्या डोंबिवली येथील हभप सावळाराम क्रिडा संकुल येथुन डोंबिवलीतील विविध भागांसाठी १४० एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. कल्याण डोंबिवली येथुन एकूण २९० एसटी बसेस ची सोय करण्यात आली आहे तर कल्याण पूर्व साठी ८० बस आणि दिवा वासीयांसाठी ९० बस देण्यात आल्या आहेत.
एकूण १५००० चाकरमानी भाविक भक्तगण यंदा कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधी नंतर गणपती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याकरिता कोकणात मोफत जाण्यासाठी या बसेसच्या सोयीचा लाभ घेतील असे वर्तवले जात आहे.