संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतून २ वर्षाकरीता तडीपार केलेल्या एका गुन्हेगारास टिळक नगर पोलीसांनी सिकंदर नुरमहंमद बगाड नावाच्या आरोपीला आज अटक केली आहे.
पोलीस उपायुक्त परिमंडळ – ३ कल्याण यांच्या आदेशाने राबविण्यात येत असणाऱ्या ऑपरेशन ऑलआऊट दरम्यान अवैध धंदे, अंमली पदार्थ विक्री करणारे तसेच रेकाॅर्डवरील हिस्टरी शीटर गुन्हेगार चेकिंग करणे कामी पोलीस गस्त करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हद्दपार केलेला गुन्हेगार सिकंदर नुरमहंमद बगाड हा फिरोज भंगारवाल्याच्या बाजूस, न्यू गोविंदवाडी, कल्याण, पुर्व येथे लपून बसला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी सदर ठिकाणी सापळा लावून त्यास पकडून त्याने मा.पोलीस उपायुक्त परिमंडळ – ३ कल्याण यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून त्याच्या विरुद्ध म.पो.का.कलम.१४२ प्रमाणे कारवाई केली.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ – ३ कल्याण, श्री.सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.सुनील कुर्हाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अजय आफळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री.पांडुरंग पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण बाकले, पोलीस उपनिरीक्षक श्री. अजिंक्य धोंडे, सहाय्यक उपनिरीक्षक श्री. श्याम सोनावणे, पो.ना.गोरखनाथ घुगे, रामेश्वर राठोड यांनी केली आहे.