मिरा भाईंदर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरद पवार यांचा ८१ वा वाढदिवस १२ डिसेंबर रोजी मिरारोड येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय येथे केक कापून साजरा करण्यात आला.
शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम सुरू केले. राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि महानगरपालिका स्तरावर सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. “सुप्रिया स्वाधार अभियान” अंतर्गत त्या सर्व योजनांचे अर्ज भरण्यात आले.
ज्या महिलांच्या पतीचा कोरोना महामारीत मृत्यू झाला त्यांच्यासाठी “संजय गांधी निराधार पेन्शन योजना” आणि ज्या मुलांचे पालक कोरोनामध्ये मरण पावले त्यांच्यासाठी “श्रवण बाळ निराधार योजने” अंतर्गत ‘अर्ज’ भरण्यात आले जेणेकरून त्यांना सरकारी मदत मिळू शकेल. कोरोनाच्या काळात ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले त्यांना शासकीय मदत मिळण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांनी यावेळी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दोन दिवसीय कार्यक्रमात शनिवारी भाईंदर पूर्व येथील होलीक्रॉस स्कूल, आरएनपी पार्क येथे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर ठेवण्यात आले होते.
ज्यामध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर, शरद पवार यांची व्याख्याने प्राध्यापक उत्तमराव भगत यांनी दिली.
त्याचबरोबर अक्षय गणेश भोसले यांनी संविधान या विषयावर मार्गदर्शन केले आणि अधिवक्ता किशोर सामंत यांनी केंद्रीय यंत्रणाच्या गैरवापरावर आणि शेतकरी कायद्यांच्या बद्दल तीव्र शब्दात सांगितले. शेवटी प्राध्यापक शशिकांत माघाडे यांनी महिला विकास धोरण आणि शरद पवार यांच्या एकूण कारकिर्दीतील महत्त्वाचे निर्णय या विषयावर कार्यकर्त्यांना संबोधित केले.
दुसऱ्या दिवशी 12 डिसेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल विद्यालयात शरद पवार यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत साजरा करण्यात आला. राज्यात होत असलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमस्थळी एलईडी स्क्रीनने करण्यात आले.जयंत पाटील, अजित पवार, रुपाली चाकणकर, नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल, शरद पवार यांनी थेट राज्यातील जनतेला संबोधित केले. ऑनलाइनच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी केंद्राच्या धोरणांविरोधात बोलताना शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणवत्तेची सर्वांना जाणीव करून दिली.
भाजपसोबत सरकार स्थापनेची चर्चा साफ फेटाळून लावत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने दिवस परतत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिमोच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून स्पष्ट होत होते.
मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती, पण नेत्यांच्या पक्षांतरामुळे पक्ष कोलमडला होता.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमू लागली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मालुसरे म्हणाले की, शरद पवार यांच्या वाढदिवसाचे साक्षीदार मानून पुन्हा एकदा ‘कार्यकर्ता जोड़ों ’ अभियान सुरू करणार आहोत आणि येत्या निवडणुकीपर्यंत नवे-जुने कार्यकर्ते सर्व लोकांना पक्षाशी जोडतील. दुसरीकडे प्रदेश सरचिटणीस अन्नूताई पाटील म्हणाल्या की, महिला आरक्षण आणि सक्षमीकरणासाठी शरद पवार यांचे मोठे योगदान आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांच्यासह प्रदेश महासचिव अन्नू ताई पाटिल प्रदेश सचिव पूर्णिमा ताई काटकर, महिला जिलाध्यक्ष सुप्रिया ताई माइनकर, कार्याध्यक्ष वनजारानी नायडू, उपाध्यक्ष माधुरी तांबे, साउथ इंडियन सेल (महिला) अध्यक्ष शिला पाटिल, डॉक्टर सेल अध्यक्ष शोभा पाटिल, विद्यार्थी सेल अध्यक्ष ओमकार धाकतोड़े, चित्रपट सेल अध्यक्ष रोहित गुप्ता, सहकार सेल अध्यक्ष लक्ष्मण पाटिल, लीगल सेल अध्यक्ष विक्रमतारे पाटिल, हिंदीभाषी सेल अध्यक्ष सुधाकर चौबे, आई टी सेल अध्यक्ष नुमान रहमान, ब्लॉक अध्यक्ष रमेश कवठेकर, बाबूराव शिंदे, गणेश लांबे, शाहनवाज सिद्दिकी, इमरान खान, पार्थ मालुसरे, प्रीति शर्मा, सोनल डीशा, प्रवक्ते प्रेम यादव यांच्यासह अन्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.