बांधकाम धारक प्रजापती म्हणतो दीड लाख दिले! हिंमत असेल तर बांधकाम तोडून दाखवा!
भाईंदर, प्रतिनिधी: अमोल मेहेर, कृष्णा थंडापाणी ये मेरे दो अनमोल रतन! असे म्हणत सहाय्यक आयुक्त प्रियांका भोसले यांनी प्रभाग समिती कार्यालय क्र. 01 मधील सफाई कर्मचारी अमोल मेहेर आणि कृष्णा थंडापाणी या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना अनधिकृत बांधकामावरील नवीन वसुली बाज म्हणून नियुक्त केल्याचे आता शिक्कामोर्तब झाले असल्याचे बोलले जात आहे.
प्रभाग प्रभाग समिती क्र. 01 च्या भाईंदर पश्चिम उत्तन धावगी येथील सरकारी जमिनीवर प्रजापती नावाच्या व्यक्तीकडून दोन गाळ्याचे अनधिकृत बांधकाम वाचवण्याकरिता स्वतःच प्रभाग अधिकारी म्हणून प्रभागात फिरणारे अमोल मेहेर व कृष्णा थंडा पाणी यांनी आयुक्त व उपायुक्त यांच्या नावाचा गैरवापर करून चक्क दीड पेटीची वसुली करून पालिकेला विक्रमी निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामगिरीत प्रियांका भोसले यांचे मोलाचे सहकार्य असल्याने या दोन अनमोल रत्नांकडून सांगण्यात येत आहे. आणि म्हणूनच गाळा मालक प्रजापती म्हणतो “हिंमत असेल तर माझे व्यावसायिक अनधिकृत गाळे तोडून दाखवा”
मेरा प्रभाग, मेरा बांधकाम, मेरा वसुली बाज अनमोल रतन (अमोल मेहेर) बोलणाऱ्या प्रियांका भोसले यांनी आता चक्क उपायुक्त यांच्या नावाचा सर्रास गैरवापर चालू केल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रभाग कार्यालयातील कर विभागातील काही कर्मचाऱ्यांना भोसले यांनी अनधिकृत बांधकामाची वसुली करण्यासाठी निवड केल्याची चर्चा महापालिका परिसरात असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
भाईंदर पश्चिमेकडील उत्तन परीसरात ना-विकास क्षेत्र आणि इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये अनधिकृत बांधकामे वाचविण्यासाठी सहाय्यक आयुक्त प्रियांका भोसले 350 रु. प्रति चौ. फूट घेत असल्याचे आरोप काही स्थानिक वर्तमानपत्रातून या आधी देखील केले गेले आहेत. त्यामुळे आता त्या महानगरपालिकेला मोठया प्रमाणात निधी मिळवून देऊन मोठा आर्थिक फायदा करून देणार आहेत अशी चर्चा पालिका वर्तुळात चालू आहे.
या कामगिरीत प्रियांका भोसलेचे दोन अनमोल रतन अमोल मेहेर आणि कृष्णा थंडापाणी यांचे मोठे योगदान असल्याचे बोलले जात असून पालिका आयुक्त दिलीप ढोले त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन मोठा सन्मान करतील का? असा सवाल सामान्य नागरिकांडून केला जात आहे.