संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवलीत दि. ०२/१०/२०२१ रोजी पोशि अजितसिंग राजपूत यांना गुप्त बातमीदारातर्फे बातमी मिळाली की, कल्याण-शीळ रोडवरील गोळवली येथे एस.जी मोटर्स च्या समोरील मोकळ्या मैदानातील बैठ्या चाळीजवळ एक इसम ईऑन मोटर कार गाडीतुन गावठी हातभट्टीची दारू विकण्यासाठी येणार आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक विलास पाटील व पथकाने कल्याण-शीळ रोडवरील गोळवली येथे एस.जी मोटर्स च्या समोरील मोकळ्या मैदानाच्या बाजूला सापळा लावून रात्री २३:४० वाजण्याच्या दरम्यान एक ह्युंडाई कंपनीची ईऑन मोटर कार क्र. एमएच-०४ एफझेड ४२१ (परी) व गाडीचालक योगेश शालीक देवकर (वय ३० वर्षे) रा. स्वतः चे घर, मोठी देसाई, पोस्ट:पडले, कल्याण-शीळ रोड, ठाणे यास शिताफीने ताब्यात घेतले. मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये ३०० लिटर हातभट्टीची गावठी दारूचे फुगे सापडले असून सदर कारवाईमध्ये एकूण १,१५,७४०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत पोहवा मंगेश शिर्के, नेमणूक कल्याण गुन्हे शाखा घटक-३ यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाणे गु.राजि.नं ५३३/२१ मुंबई प्रोहिबिशन कायदा कलम ६५ (अ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर ताब्यात घेतलेल्या इसम योगेश शालीक देवकर (वय ३० वर्षे) याच्या गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता त्याच्यावर रायगड जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन गुन्हे मुंबई प्रोहिबिशन कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे नोंद असल्याचे दिसून आले आहे. जप्त मुद्देमाल व ताब्यात घेतलेला इसम यांस पुढील कारवाई व तपासासाठी मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पोलीस निरीक्षक श्री.विलास पाटील, पोउनि मोहन कळमकर, पोहवा शिर्के, पोशि राजपूत, सचिन वानखेडे व पोशि नावसारे यांनी केलेली आहे.