Latest News देश-विदेश महाराष्ट्र

स्पुटनिक व्ही लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशात काही दिवसांत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला वेग येण्याची शक्यता आहे.
देशात १८ वर्षावरील सर्वांना करोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र काही ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असल्याने अडथळे येत आहेत.
अशातच ‘स्पुटनिक व्ही’ लसीचे दीड लाख डोस भारतात दाखल झाल्याने येत्या काळात लसीकरण मोहिमेला वेग येणार आहे.

सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस उपचारासाठी वापरण्यात येत आहे. ‘स्पुटनिक व्ही’ मुळे भारतामध्ये तिसरी लस उपलब्ध झाली आहे.

भारतात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता तिसरी लस मिळाल्यामुळे भारतासाठी हा दिलासा ठरणार आहे.
‘स्पुटनिक व्ही’ लसीची परिमामकारकता ९२ टक्के असल्याचं सांगण्यात येत आहे.
‘स्पुटनिक व्ही’ लस एस्ट्राजेनेकाच्या लसीसारखी एक व्हायरल वेक्टर लस आहे. मात्र या लसीचे दोन्ही डोस वेगवेगळे आहेत. या लसीचे दोन डोस वेगवेगळे असल्याने कोरोनावर दूरगामी परिणाम दिसत आहेत. या लसीला आतापर्यंत ६० हून अधिक देशांनी मान्यता दिली आहे. कॉंग्रेसचे नेते मल्लुकर्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘स्पुटनिक व्ही’च्या लसींचे दीड लाख डोस भारतात पोहोचले असल्याची माहिती दिली. तसेच रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडानेही भारतात उत्पादनांसाठी स्थानिक कंपन्यांशी करार केला आहे असे सांगितले.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published.