संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन ह्या क्लबला स्थापन होऊन २८ वर्षे पूर्ण झाली. या कालखंडात मिडटाऊन तर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले गेले उदा. आदिवासी पाड्यात बंधारा, स्वर्गारोहण रथ डोंबिवली (शव वहिनी), मेडिकल कँप, व्यसनमुक्ती केंद्र इ. तसेच भविष्यातही अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. दर वर्षी नवीन येणारे अध्यक्ष मागिल जे उपक्रम राबविले जात होते त्याप्रमाणे ते राबविले जातात आणि ते काळजीपूर्वक अमलात आणतात व नविन काही समाजपयोगी उपक्रम राबविले जातील यासाठी सर्वसंमतीने आयोजित केले जातात. आजच्यामितिला रोटरीच्या इंटरनॅशनल व स्थानिक लेव्हलवर पल्स पोलिओ चा डोस पाच वर्षांपर्यंत लहान मुलांना न चुकता वर्षातून दोनतीन वेळा दिला जातो त्यास रोटरी इंटरनॅशनलन अनेक कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देत असते. रोटरी क्लब चे मेंबर्स एखाद्या उपक्रमाला निधी कमी पडला तर न डगमगता स्वतः निधी उपलब्ध करून देतात हे विशेष आहे. दोन वर्षांपूर्वी रो. अनिल हीरावत यांची संकल्पना आणि रो. संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रोटरी हेल्थ सेंटर एका छोट्या जागेत सुरू केलं पण जागा अपुरी पडू लागल्याने यावर्षीचे अध्यक्ष रो. जितेंद्र नेमाडे यांनी गोग्रासवाडी येथे एका प्रशस्त जागेत स्थलांतरित केले असून त्याचा लाभ दरमहा अनेक नागरिक घेत आहेत.
या हेल्थकेअर सेंटर मध्ये रक्त तपासणी, दातांचा आणि डोळ्यांचा दवाखाना, फिजिओथेरपी या सोयी सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत व लवकरच महापालिकेची साथ मिळाली तर एक चांगले रूग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे व तो लवकरच पूर्ण होईल या करता रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन तर्फे आखणी सुरू आहे, त्याकरिता कडोंमपाकडे बांधीव जागा किंवा मोकळा भुखंड मिळावा म्हणून पाठपुरावा केला जात आहे. सध्या या रोटरी मिडटाऊनचे ६४ सदस्य असून त्याचे सर्वांचे सहकार्य चांगल्याप्रकारे समाजोपयोगी उपक्रमात मिळत असते असे अध्यक्ष रो. जितेंद्र नेमाडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.