संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी माजी कसोटीपटू संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात लढत होणार आहे.
या निवडणुकीसाठी भाजपाचे आशिष शेलार यांनी आधी अर्ज दाखल केला होता, मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोषाध्यक्ष पदासाठी त्यांना संधी मिळाल्याने शेलार यांनी आपला अर्ज मुंबईतून मागे घेतला, शेलार यांना शरद पवार गटाचाही पाठिंबा होता.
शेलार यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर शेलार – पवार गटाकडून आता अमोल काळे हे मैदानात असून त्यांची थेट लढत संदीप पाटील यांच्याशी होईल. संदीप पाटील यांना अनेक माजी खेळाडूंचा पाठिंबा आहे असे वर्तविण्यात येत आहे.