Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

शेकडो कर्मचाऱ्यांचा एलॉन मस्कच्या कडक धोरणा विरोधात ट्विटरला रामराम..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे गेले काही दिवस या कंपनीत रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरमधून एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर आता कंपनीच्या कार्यपद्धतीला कंटाळून शेकडो कर्मचारी स्वत:च नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत.

“कार्यक्षम पद्धतीने जास्त तास काम करण्याची तयारी ठेवा अथवा कंपनी सोडून जा”, असा इशारा ईमेलद्वारे एलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दिला होता. या इशाऱ्यानंतर जवळपास ८० टक्के कर्मचारी नोकरी सोडू शकतात, असे एका अहवालातून समोर आले आहे. एलॉन मस्क यांच्या ईमेलनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. ट्विटरमध्ये राजीनामा सत्र सुरू झालं असून १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे.

या पार्श्वभूमीवर आठवडाभर कंपनीचे ऑफीस बंद ठेवण्याचा निर्णय मस्क यांनी घेता आहे. २१ नोव्हेंबर पर्यंत ट्विटरचे ऑफीस बंद राहणार आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *