Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

‘गौरव यात्रा’ त्यावेळी का काढली नाही ? – अजित पवार


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. या सभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गौरव यात्रा काढण्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला.

आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो. मात्र, आपल्या राज्यातील महापुरुषांचा राज्यपालांकडून अपमान होत असताना दातखिळी बसली होती का ? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, तुम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून सांगता आणि मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करता. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला. त्यावेळी दातखीळ बसली होती का ? त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही ? आम्हाला सर्व महापुरुष यांचा आदर आहे. आज दोन केंद्रीय मंत्री राज्य सरकारचे मंत्री गौरव यात्रा काढतात हा दुटप्पीपणा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले हे शक्तीहीन नपुंसक सरकार आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे का हिंमत ? असेही अजित पवार म्हणाले.

ज्यापद्धतीने महाराष्ट्राचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. जर हे अशाच पद्धतीने घडत राहिलं. तर देशात आणि राज्यात देखील स्थिरता राहणार नाही. जी देशाला, महाराष्ट्राला परवडणारी नाही. प्रशासनाचा देखील यावरून विश्वास उडेल. प्रशासन देखील चांगल्या पद्धतीने चालणार नाही. ज्या प्रकारे एक गट बाजूला गेला आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली. निवडणूक आयोग जर अशा पद्धतीने निर्णय द्यायला लागले तर कसं होणार ? सुप्रीम कोर्टाकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. न्याय देवतेवर सर्वांचा विश्वास आहे. निश्चितपणे न्याय देवता न्याय देईल, असेही अजित पवार बोलताना म्हणाले.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *