संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
जिल्हा नाशिक येथे आईच्या मृत्यूने व्यथित झालेल्या मुलीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑक्सिजन बेड न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या मृत्यू ने व्याकुळ होऊन सॅनिटायझर पिऊन लेकीनेही आयुष्य संपवलं.
नाशिकमध्ये राहणाऱ्या जया भुजबळ या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारासाठी ऑक्सिजन बेड न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या मृत्यूने कन्या शिवानी भुजबळ व्यथित झाली होती. यातूनच तिने हे टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.
शिवानीने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. आई आणि मुलीचा पाठोपाठ मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.