होतकरू पत्रकार ऍड. इरबा कोनापुरे यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने धनगर रत्न पुरस्कार !
मिरा भाईंदर: राजमाता आहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे येथे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात समाज कार्यात काम करणाऱ्या १० जणांचा सत्कार करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील, नवी मुंबई, मिरा भाईंदर, कल्याण, पनवेल व मुंबई येथील विविध क्षेत्रात धनगर समाजातील व्यक्तींना विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्याना एकूण १० जणांना धनगर रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळेस शिवसेना नेते, नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, ठाणे पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा बाळासाहेब पाटील, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे व गणपत पिंगळे पोलीस निरीक्षक, ठाणे महापालिकेचे नगरसेवक योगेश जानकर, यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे आणि धनगर समाजाचे अनेक राजकीय नेते उद्योजक व अनेक समाजसेवक व्यापारी उपस्थित होते.
धनगर प्रतिष्ठान ठाणे यांचे तर्फे या वर्षीचे धनगर रत्न पुरस्कार हे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दै. सामना व आपलं महानगरचे पत्रकार ऍड. इरबा कोनापुरे (पत्रकारिता), आप्पा सरगर, पोलीस (क्रीडा), डॉ. मानसी डोईफोडे (वैद्यकीय), प्रसाद पांढरे (शासकीय), विशाल दोलताडे (उद्योजक), ह.भ.प. भगवान कोकरे, कीर्तनकार (सामाजिक), मोनिका महानवर (राजकीय) नगरसेविका पनवेल महानगरपालिका, रामभाऊ लांडे (लेखक – साहित्यिक), लक्ष्मीकांत परदेशी (शैक्षणिक), ऋणानुबंध सामाजिक संस्था (सामाजिक संस्था) यांना प्रदान करण्यात आले आहेत. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन हे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे व महिला मंडळ अध्यक्ष माधवी बारगीर यांच्यामार्फत जाहीर झालेले होते. त्याचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे पार पडला.
मागील ११ वर्षांपासून ठाणे जिल्हयात समाज कार्य या प्रतिष्ठान करण्यात येत आहे. या प्रसंगी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजासाठी भव्य दिव्य असे समाज मंदिर व हॉल बांधण्यात येईल त्यासाठी पाठपुरावा करावा त्यास आम्ही मान्यता देतो असे कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
या विशेष कार्यक्रमाचे आयोजन धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक कुरकुंडे, कार्याध्यक्ष महेश गुंड, सचिव गणेश बारगीर, खजिनदार अविनाश लबडे, उपाध्यक्ष कुमार पळसे व राजेश वीरकर, प्रचार प्रमुख सचिन बुधे, उपसचिव तुषार धायगुडे, सुरेश भांड तसेच सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव यांच्या उपस्थितीत केलेल्या कामाची पोचपावती मिळाली. तसेच धनगर प्रतिष्ठान आयोजित पत्रकारिता क्षेत्रात करत असलेल्या कामावरून ‘धनगर रत्न’ पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी समाज बांधवांनी दिलेले प्रेम आणि सन्मान त्याबद्दल समस्त समाज बांधवांचा व धनगर प्रतिष्ठानचा ऋणी आहे अशी भावना दै. सामना व आपलं महानगर ह्या वृत्तपत्राचे पत्रकार ऍड. कोनापुरे इरबा यांनी व्यक्त केले आहे.