संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
डोंबिवली पूर्वेकडील आजदे गाव हे ग्रामीण क्षेत्रात येत असून तेथील निवडून आलेल्या नगरसेवकाचा कार्यकाळ संपुष्टात येऊन बराच काळ लोटला असून आजदे गाव सध्या कल्याण डोंबिवली प्रशासनाच्या ताब्यात आहे. त्या भागात गटारांचे काँक्रीटीकरण अध्याप झाले नसून पालिके कडून तेथील रहीवाश्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसून येत्या पावसाळ्यात गटार नाले तुंबून सांडपाणी तेथील चाळीत शिरून रहिवाश्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.
तेथील भागात गटारांचे सांडपाण्याचे योग्य नियोजन नसताना व सांडपाण्याचा निचरा होत नसताना महापालिका तसेच एमआयडीसी नवीन बांधकामांना परवानगी देतेच कशी असा प्रश्न तेथील समाजसेवक श्री.मनोज गिरी यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर उपस्थित केला आहे. त्यांनी स्वतः ‘ई’ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून आजदे गावातील सदर जागेवर प्रत्यक्ष आणून संपूर्ण परिसर दाखवून दोन दिवसात महापालिके कडून नालेसफाई करून घेतली. पण येत्या पावसाळ्यात गटारांची पक्के बांधकाम झाले नसल्याने पुन्हा परिसरातील गटारे तुंबल्याशिवाय राहणार नाहीत असा मानस देखील प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलून दाखविला व कल्याण डोंबिवली महापालिकेलाआवाहन केले की गटारांची पक्की बांधकामं जोवर होत नाहीत तोवर नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये अथवा स्थानिक राहिवाश्यांचे त्या विरोधात उग्र आंदोलन केले जाईल.