_
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या गौतम अदानी यांनी गरुडझेप घेत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत थेट दुसरे स्थान मिळवले आहे. यादीतील जेफ बेझोस व बर्नार्ड अर्नाल्ट यांना मागे टाकत गौतम अदानी दुसऱ्या स्थानी पोहचले आहे. सध्या अदानी यांच्या पुढे फक्त एलॉन मस्क आहेत. जर गौतम अदानी यांची अशीच घोडदौड सुरु राहल्यास ते अव्वल स्थानी देखील पोहचू शकतात. सध्या गौतम अदानी यांची एकूण संपत्ती १५३.९ बिलियन डॉलर इतकी झाली आहे व एलॉन मस्क यांची संपत्ती २७३.५ बिलियन डॉलर इतकी आहे.
या यादीत दुसरे भारतीय उद्योपती मुकेश अंबानी हे देखील असून त्यांनी देखील नवव्या स्थानावरून आठव्या स्थानी झेप घेतली आहे. भारतातील अदानी समूह हा तिसरा सर्वात मोठा उद्योग समूह असून या अंतर्गत त्यांचे बंदरे, खाणकाम, ऊर्जा, संसाधने, संरक्षण, गॅस, विमानतळे व एरोस्पेस इत्यादी उद्योग आहेत.