Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

शिंदे गटातील खासदार भाजपाच्या तिकिटावर लढणार ? भाजपाचा शिंदे गटाला प्रस्ताव, या खासदारांच्या नावांची होतेय चर्चा.


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुढील लोकसभा निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा अवकाश आहे, मात्र सत्ताधारी भाजपने अनेक लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपाने त्यांचा खासदार नसलेल्या असलेल्या १६ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. यासाठी भाजपाने शिंदे गटासमोर भाजपाच्या तिकिटावर ओढण्याचा प्रस्ताव ठेवला या बदल्यात विधानसभेला जास्तीचा जागा देण्यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

भाजपाने महाराष्ट्रातील कल्याण, मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, पालघर, शिर्डी, बुलढाणा नाशिक, मावळ, यवतमाळ, रामटेक या शिंदे गटाच्या खासदारांच्या मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. त्याचवेळी मोदींच्या लोकसभा विजयात कोणतेही विघ्न नको यासाठी भाजपाने शिंदे गटासमोर त्यांचे काही खासदार भाजपाच्या तिकिटावर लढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यात पालघरचे गावीत, बुलढाण्याचे जाधव, मावळचे बारणे, रामटेकचे तुमणे यांचा समावेश आहे. अर्थात शिंदे गटाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण लोकसभा निवडणुकीत मोदींची असलेली लोकप्रियता फायद्याची ठरण्याची शक्यता लक्षात घेता शिंदे गटातील काही खासदार भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी उत्सुक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातही गावित यांनी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आता शिंदे गट असा प्रवास केलेला आहे. त्यामुळे भाजपाच्या प्रस्तावर खासदार शिंदेना होकारासाठी गळ घालण्याची शक्यता आहे.

भाजप पद्धतशीरपणे शिंदे गटाला सुरंग लावत असुन काही खासदार आपल्या तिकिटावर लढवत शिंदे गटाची बार्गेनिंग पावर कमी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. राज्यात आजघडीला जरी शिंदे सरकार असले तरी सत्तेची धुरा फडणवीसांच्या हाती असल्याचे अधोरेखित झाले आहे. महत्वाची खाती स्वतः कडे ठेवत शिंदे गट केवळ नामधारी बनला आहे आता लोकसभेच्या बदल्यात जास्त विधानसभा जागा देण्याचा प्रस्ताव एक भुलथाप ठरण्याची जास्त शक्यता आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *