अवधुत सावंत, प्रतिनिधी : राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सध्या लागू असणारे निर्बंध राज्य सरकारकडून अधिक कठोर केले जाण्याची शक्यता आहे. लॉकडाउनला उद्योजक तसंच महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत विरोध असल्याने निर्बंध अजून कठोर केले जाण्याची शक्यता असून राज्य सरकार कडून यासंबंधीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नियम पाळा, लॉकडाउन टाळा असं सांगत राज्यातील जनतेला इशारा दिला आहे. शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“बेड्स उपलब्ध नाही अशी परिस्थिती मुंबईत किंवा जिल्ह्यांमध्ये कुठेही नाही.
काही ठराविक रुग्णालयात जिथे खूप मागणी असते तिथे अडचणी निर्माण होत आहे.
सध्या मुंबईत आय.सी.यू चे ४०० बेड्स, ऑक्सिजनचे २१६० बेड्स आणि व्हेंटिलेटरचे २१३ बेड्स उपलब्ध आहेत.
बेड्स वाढवण्याच्या सूचना सर्व प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली आहे.
राज्यात कोरोनाचे बेड्स सर्वत्र उपलब्ध आहेत.
काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याची माहिती मिळाल्यानंतर बेड्स वाढविण्याच्या सूचना आरोग्य विभागाने प्रशासनाला दिल्या आहेत.तसेच ऑक्सिजनचा वापर ८०% आरोग्यासाठी व २०% उद्योगासाठी करण्याचे निर्देश ही दिले आहेत.
नियम पाळा आणि लॉक़डाऊन टाळा लॉकडाऊनचा कोणताही निर्णय अजूनतरी झालेला नाही,
मात्र गर्दी टाळण्यासाठी काही कडक निर्बंध लावण्याचे नियोजन राज्य सरकार करत आहे.
अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल,असे सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.