संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी:अवधुत सावंत
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कार्यालयातून बनावट बांधकाम परवानगी आदेश बनवून फसवणूक केल्याप्रकरणी केडीएमसीकडून मानपाडा पोलीस ठाण्यात एकाच वेळी २७ विकासकांकांवर गुन्हे दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल झालेली असून केडीएमसी आयुक्तांकडे तक्रार अर्जही सादर करण्यात आला आहे. यानंतर केडीएमसीकडून झालेल्या पडताळणीमध्ये बांधकाम परवानग्या बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील २७ गावांमधील २७ बांधकाम आणि डोंबिवली विभागातील ३९ बांधकाम परवानग्या असे मिळून एकूण ६७ बांधकाम परवानगी आदेश बनावटरीत्या तयार करण्यात आले असून त्यावर कारवाई करण्याचे आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेमध्ये नमूद केले आहे. तसेच या बांधकाम परवानग्या यासंदर्भात पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांकडेही लेखी तक्रारही केली आहे. त्यावरून केडीएमसीच्या नगर रचना (टाऊन प्लॅनिंग) विभागातील सहाय्यक संचालकांनी या बांधकाम परवानग्या तपासल्या असता त्या बनावट असल्याचे आढळून आल्याचेही पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
यासंदर्भात केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की अशा प्रकारे एकूण ६७ परवानग्या बनावट कागदपत्रे तयार करून दिल्या गेल्याचे संबंधित विकासकांनी भासवले आहे. तसेच या परवानग्या च्या आधारावर त्यांनी रेराकडेही रजिस्ट्रेशन केल्याची माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली. तसेच या विकासकांवर फसवणुकीचे गुन्हे दखल करण्यात असले असून रेरा संस्थेशीही यासंदर्भात संपर्क साधण्यात येत आहे.
केडीएमसीकडून विकासकांना देण्यात आलेल्या बांधकाम परवानग्या केडीएमसीच्या वेबसाईटवरही टाकल्या जात असून रेरा आणि आपली वेबसाईट जोडण्यात येणार आहे. जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नसल्याचेही आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
भूमाफियांची नावे
नकुल गायकर, सुमीत आचार्य, मे. समर्थ डेव्हलपर्स (आजदे गोळवली), वसंत म्हात्रे, सोमनाथ जाधव, मे. बिल्डर्स डेव्हलपर्स (नांदिवली), शांताराम जाधव, देवेंद्र म्हात्रे मे. विनायक कन्स्ट्रक्शन (सोनारपाडा), रामसुरत गुप्ता, आदित्य इन्फ्रा (नांदिवली), देवचंद कांबळे, मे. गोल्डन डायमेंशन (नांदिवली), प्रदीप ठाकूर, प्राची असोसिएशट (गोळवली), चंद्रशेखर भोसले, रुंद्रा इन्फ्रा (नांदिवली), प्रसाद शेट्टी, मे. गोल्डन डायमेंशन, ओम लिलाई बिल्डर्स, राजेश विश्वकर्मा, शंकर तेंडुलकर, तुकाराम पाटील (निळजे), अर्जुन गायकर, राजाराम भोजणे, गोल्डन डायमेंशन (आजदे), अविनाश म्हात्रे, मे. गोल्डन डायमेंशन, बालाजी डेव्हलपर्स (नांदिवली), अशोक म्हात्रे, मे. गोल्डन (नांदिवली), अरुण सिंग, बालाजी डेव्हलपर्स, मे. गोल्डन डायमेंशन (माणगाव), सरबन बिंदाचल, मे. विष्णु शाहु कन्सट्रक्शन, मे. गोल्डन डायमेंशन (माणगाव), संजय जोशी, मे. संस्कार बिल्डकाॅन, मे. गोल्डन डायमेंशन (निळजे), चिराग पाटील (आडिवली), महेश शर्मा, सामी असोसिएट (सोनारपाडा), अमृता दीपक घई, मे विनायक वाटिका बिल्डर्स, शेवंताबाई पाटील, (सोनारपाडा), शांताराम जाधव, देवेंद्र म्हात्रे (सोनारपाडा), मनोहर काळण, मे. शिवसाई बााजी बिल्डकाॅन (आजदे गोळवली), अनिल पाटील, मे. त्रिदल एन्टरप्रायझेस (आडवली), सुभाष नामदेव म्हात्रे, अमीन पटेल (नांदिवली), पूनम पाटील, जडवतीदेवी यादव (सोनरपाडा), सुनील लोहार, पार्वतीबाई काळण (सागाव), शिवसागर यादव, मे. साई बिल्डर्स डेव्हलपर्स (आडवली), निवेश एन्टरप्रायझेस जी. एन. गंधे, राजेश ठक्कर.