Latest News गुन्हे जगत

बनावट आरटीपीसीआर कोरोना स्वॅब स्टिक प्रकरणी सूत्रधारावर गुन्हा दाखल; रॅकेटचा होणार पर्दाफाश

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गोरगरिबांना ठराविक रकमेत कोरोनाच्या आरटीपीसीआर स्वॅब तपासणीसाठी वापरणाऱ्या जाणाऱ्या स्टिकच्या पॅकिंगचे काम देणारा सुत्रधार हा उल्हासनगरातील रबर कारखानदार निघाला आहे. मनिष केसवानी, असे त्या सुत्रधाराचे नाव असून एफडीएचे (अन्न व औषध प्रशासन) अधिकारी विलास तासखेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनिषवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी मनिष फरार झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे परदेशी कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट स्वॅब किट आरोपी तयार करत असल्याचे समोर आले आहे. आता त्याच्या अटकेनंतर स्वॅब आरटीपीसीआर टेस्टच्या स्टिक बनवण्यामागील रॅकेटचा पर्दाफाश होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त अवघ्या २० रुपयांत एक हजार स्टिकच्या पॅकिंगचे काम उल्हासनगर कॅम्प २ च्या खेमानी परिसरात संत ज्ञानेश्वर नगर परिसरात घराघरात महिला, लहान मुले ही हातात हॅन्डग्लोव्ह्ज व तोंडाला मास्क न लावता तसेच सॅनिटायझर न वापरता स्वॅब स्टिकची पॅकिंग करत असल्याचा प्रकार व्हिडिओद्वारे व्हायरल झाला होता.

या कामामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्या स्टिक जमिनीवर ठेऊन त्यांची प्लास्टिकच्या एका पॅकेटमध्ये पॅकिंग केली जात होती. विशेष म्हणजे मनिष केसवानी याने महिलांना अवघ्या २० रुपयात एक हजार स्टिकच्या पॅकिंगचे काम दिले होते.माहिती देताना आरोग्य अधिकारी परदेशी कंपनीच्या नावाचा गैरवापर करून बनावट स्वॅब किट एफडीए चे अधिकारी विलास तासखेडकर यांच्या तक्रारीत मनिष याने किट बनविणाऱ्या एका परदेशी कंपनीच्या नावाचा गैरवापर करून व कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट स्वॅब किट तयार करून घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आरोपी मनिष केसवानी याच्यावर गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस आयुक्त डी. डी .टेळे, उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी संत ज्ञानेश्वर नगरात असणाऱ्या मनिषच्या कारखान्यात व घरावर छापा टाकला. पण तो फरार झाला असून त्याला पकडण्यासाठी किंबहूना त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.

मनिषच्या अटकेनंतर अनेक प्रश्नांच्या उलगडा होईलच सोबत रॅकेटचा पर्दाफाश होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *