संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
दिनांक ०६/०५/२०२१ रोजी ०४.४२ वाजता विष्णूनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर ८५/२०२१ भादवि कलम ३०७,३२४,३२३,५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी हे राहत्या घराच्या बाहेर चक्कर मारत असतांना यातील अटक आरोपी यांच्या पैकी एक हा कोलते यांच्या घराचा दरवाजा ठोठावत होता त्यास फिर्यादी यांनी कोलते यांच्या घराचा दरवाजा ठोठावु नका असे सांगितले असता त्या गोष्टीचा त्यांना राग येऊन त्यांनी आपसात संगनमत करून फिर्यादिस शिवीगाळ करून त्यांच्या दोन्ही डोळ्यावर हाताचे ठोशे मारून, अटक आरोपीत अनिकेत उर्फ दत्तात्रय म्हात्रे उर्फ पांडा याने फिर्यादी याला संपवण्याची वार्ता करत त्याच्या गळ्यावर उजव्या बाजूला चाकूने वार करून दुखापत केली, तसेच पाहिजे असलेला आरोपी साहिल श्रीनिवास ठाकूर उर्फ वालट्या याने लाकडी बांबूने फिर्यादीच्या पाठीवर व डोक्यावर मारून त्यास दुखापत केली म्हणून गुन्हा दाखल झाला होता. सदरच्या गुन्ह्याचा तपास हा विष्णूनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी स.पो.नि गणेश वडणे व त्यांचे पथक यांनी त्यांच्या गुप्त महितीदारा मार्फत हवा असलेला आरोपी जो आपल्या राहण्याची जागा नेहमी बदलत असल्याने तो सुमारे ३ महिन्यांपासून मिळून येत नसतांना गुप्त बातमीदारा मार्फत आरोपिचा शोध घेऊन हवा असलेला आरोपी नामे १) साहिल श्रीनिवास ठाकूर उर्फ वालट्या (वय २२ वर्षे) रा. हनुमान निवास चाळ, चाळ नंबर २, रूम नंबर २, सुभाष रोड, डोंबिवली पश्चिम २) सोमेश नवनाथ म्हात्रे (वय २५ वर्षे) रा.ठि. चिंचोलीपाडा, हनुमान मंदिराजवळ, सोन्याच्या दुकानाच्या मागे, डोंबिवली पश्चिम याला मोठागाव, शंकर मंदिराच्या पाठीमागे, रेतीबंदर रोड येथे पकडून दिनांक ०५/०८/२०२१ रोजी १९:२७ वाजता अटक करण्यात आली आहे. यापूर्वी नमूद गुन्ह्यात अनिकेत दत्तात्रेय म्हात्रे उर्फ पांडा या आरोपीस दि. १५.०५.२०२१ रोजी अटक केलेली आहे तो सध्या जेल मध्ये आहे, यामधील उर्वरित २ आरोपी यांना वरील प्रमाणे आता अटक केले आहेत.
सदरची कामगिरी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग, डोंबिवली चे श्री.जयराम मोरे, डोंबिवली विभाग व मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली १) सपोनि गणेश वडणे, २) पोहवा एस एन. नाईकरे, ३) पोना एस के. कुरणे ४) पोना बी के. सांगळे, ५) पोशि के ए.भामरे, ६) पोशि एम एस. बडगूजर यांनी सदरची कारवाई यशस्वी पणे पार पाडली आहे.