संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
सातारा दि. २६ ऑगस्ट २०२१ मेढा ता. जावळी येथील रहिवासी शशिकांत देशमुख यांच्या मुलगी रोमाली देशमुख हिचा विवाह तिच्या पसंतीनुसार व सर्व समाजाला सांगून विवाहाला निमंत्रित करून आंतरजातीय केला असतानाही त्यांच्याच समाजातील नंदिवाले समाजातील जात पंच यांनी देशमुख कुटुंबियांना बहिष्कृत केले. त्यांनंतर समाजातील अनेक कार्यक्रमांना त्यांना बोलावले नाही. या बहिष्कार प्रकरणात पोलादपूर जि.रायगड नागेवाडी सातारा मेढा जि.सातारा रत्नागिरी असे तीन जिल्ह्यातील जात पंच सहभागी होते.याबाबत सातारा जिल्हा अंनिस कडे जुलै २१ रोजी लेखी तक्रार आली होती. याची गंभीर दखल घेऊन सातारा पोलीस अधीक्षक मा.बन्सल साहेब यांची अंनिस शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करून सामाजिक बहिष्कार कायदा अस्तित्वात असूनही अशा घटना घडत आहेत याकडे लक्ष वेधून संबंधित पंच व तक्रादार यांना बोलवून चर्चा करावी व सामंजस्य करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करावा अन्याय रीतसर सामाजिक बहिष्कार कायद्याच्या कलमान्वये कायदेशीर कारवाई करावी असे आदेश दिले. या अनुषंगाने मेढा पोलीस स्टेशन चे सपोनि. अमोल माने व सातारा जिल्हा अंनिस आणि संबंधित सर्व पंच तसेच तक्रारदार यांचे समक्ष आज सामंजस्य बैठक झाली. बैठकीत सर्व बाजूनी चर्चा करून जात पंचायत या द्वारे दिले जाणारे अन्यायकारक निर्णय यापुढे घेतले जाणार नाहीत. देशमुख कुटुंबातील सर्वाना यापुढे सामावून घेऊन कार्यक्रम घेतले जातील. याही पुढे जाऊन सर्वच जात पंच यांना एकत्रित करून जातपंचायत बरखास्त करून एक आदर्श निर्माण करू असे आश्वासन सर्वच उपस्थित पंचांनी दिले.
तसेच समाजातील आंतरजातीय लग्न केलेल्या व बहिष्कृत केलेल्या सर्व जोडप्याना व इतर लोकांना एकत्रित बोलावून परत समाजात घेण्याचा निर्णय व त्यांचा सत्कार करू असेही नियोजन भविष्यात करू असे एकमुखाने सर्वांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर प्रशांत पोतदार जात निर्मूलन चे राज्य सदस्य शंकर कणसे बुवाबाजी संघर्ष राज्य सदस्य भगवान रणदिवे जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने शाखा कार्याध्यक्ष डॉ. दीपक माने जावळीचे अंनिस कार्यकर्ते प्रतापराव सकपाळ श्री.कांबळे ऍड. दयानंद माने हे सर्वच जण बैठकीला उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला.