संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
दिनांक २२ जुलै रोजी लागलेल्या यंदाच्या सीबीएसई बोर्ड २०२१-२२ इयत्ता १०वी च्या परीक्षेच्या निकालात डोंबिवली पूर्वेकडील तुकाराम नगर आयरे रोड येथील ओम मातृछाया गृहनिर्माण सोसायटीत राहणाऱ्या व पीएनटी येथील ‘होली एंजेल्स’ शाळेत शिकत असणाऱ्या ह्या गुणवंत विद्यार्थिनी कु.दीक्षा सुरेंद्र सुवर्णा हिने ५०० गुणांपैकी ४९८ गुण (९९.६०℅) पटकावत महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला म्हणून आज डोंबिवली-कल्याण महापालिकेचे आयएएस दर्जा लाभलेले आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते तिला पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक देऊन कौतुक करत “महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनीने सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत मिळविलेले यश कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे” असे उद्गार काढून तिचा सत्कार करण्यात आला.
सोबत कु.दीक्षा सुरेंद्र सुवर्णा या गुणवंत विद्यार्थिनीचे पालक श्री व सौ सुरेंद्र सुवर्णा व ‘होली एंजेल्स’ संस्थेचे अध्यक्ष डॉ.ओमेन डेव्हिड सर, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री.बिजॉय ओमेन, श्रीमती रफत शेख यांचा देखील यावेळी कडोंपा चे मा.आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आपल्या कल्याण-डोंबिवली करांसाठी सदर बाब सुवर्ण अक्षरात नोंद करण्यासारखी आहे व भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात किंवा भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश घेवून नागरिकांची सेवा करण्याचा मनोदय कु.दीक्षा सुवर्णा हिने यावेळी बोलताना व्यक्त केला.
या सत्कार सोहळया समयी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिमंडळ-१ चे उप-आयुक्त श्री.धैर्यशील जाधव, शिक्षण विभागाच्या उप-आयुक्त वंदना गुळवे, शिक्षणाधिकारी श्री. विजय सरकटे, श्री. श्याम भोईर, शिक्षण विभागातील कर्मचारी व पत्रकार बंधू उपस्थित होते.