संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह
मुंबई: सुरेशचंद्र राजहंस महाराष्ट्रात मातंग समाजाला राजकीयदृष्टय़ा जागरूक करून, त्यांच्या न्याय्य हक्कासाठी अविरत संघर्ष करणारे मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते स्व. बाबासाहेब गोपले साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त मानखुर्द येथे आयोजित कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते श्री सुरेशचंद्र राजहंस साहेब यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ व क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची ज्यांच्या प्रमुख योगदानातून निर्मिती झाली, रस्त्यावर उतरून मातंग समाजाचा आवाज शासन दरबारी पोहचायचे ते मातंग समाजाचे लढवय्या नेते बाबासाहेब गोपले साहेब यांचे मुंबईत भव्य असे स्मारक व्हावे यासाठी राष्ट्रीय मातंग महासंघ व अन्याय निवारण कृती समिती, महाराष्ट्र च्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे मातंग समाजाचे नेते व काँग्रेस प्रवक्ते राजहंस म्हणाले.
मानखुर्द येथील गोपले साहेब यांच्या निवासस्थानी त्यांची पत्नी व मातंग समाजाच्या आदरणीय नेत्या कुसुमताई गोपले मॅडम यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय मातंग महासंघाचे मुंबई अध्यक्ष सजीत चांदणे, अन्याय निवारण कृती समितीचे मुंबई सचिव दिलीपराव कसबे, जिल्हा अध्यक्ष तानाजी सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.