संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
एकेकाळीचे कट्टर दुश्मन असणारे कम्युनिस्ट पक्ष आणि शिवसेना आज चक्क एकत्र आले, अंधेरी पोट निवडणुकीत पाठिंबा देण्याच्या निमित्ताने कम्युनिस्टांनी थेट आज मातोश्री गाठली.
एकेकाळी मुंबई वर वर्चस्व असलेल्या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेने आपले सर्वस्व पणाला लावले होते, त्यातूनच पुढे कॉम्रेड कृष्णा देसाई यांचा खून ही झाला होता, त्या आरोपात शिवसैनिक तुरुंगातही गेले होते.
मात्र काळाच्या ओघात चित्र पूर्णपणे पालटले असून कट्टर दुश्मन आणि ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी अशी ख्याती असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आणि बाळासाहेबांच्या उभ्या आयुष्यात कधीही न घडलेली गोष्ट आज घडली.
आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही असे आठवडा भरापूर्वीच स्पष्ट करणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला अंधेरी पोट निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील हिंदुत्व कट्टर विरोधक कम्युनिस्ट पार्टीच्या शिष्टमंडळाने मातोश्री गाठली आणि त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.