संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
कुठल्याही कार्यक्रमाची सुरूवात ही राष्ट्रगीताने होते पण शासकीय कार्यालयात कर्मचारी आल्यावरच कामकाजाची सुरुवात होते पण नागपूरात असे एक सरकारी कार्यालय आहे जेथे कामकाजाची सुरुवात प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीताने होते.
नागपुरातील (जीपीओ) जनरल पोस्ट ऑफिस, टपाल विभाग आहे जिथे येथील कामकाजाची सुरुवात ही प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीताने होते. या कार्यालयाच्या कामकाजाची सुरुवात सकाळी १० वाजताची आहे. मात्र कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी निर्धारित वेळेच्या १५ मिनिटा अगोदरच कार्यालयात पोहोचतात आणि त्यानंतर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोस्टमन एकत्रित येऊन प्रतिज्ञा आणि राष्ट्रगान गाऊनच आपल्या कामकाजाला सुरुवात करतात. त्यांचा हा नित्यक्रम असून गेल्या १२ वर्षांपासून अविरतपणे हे सुरू आहे.