संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
आधार कार्ड सध्याच्या काळात एक महत्त्वाचा दस्तावेज बनला आहे. कोणत्याही सरकारी योजना असो वा पुरावा म्हणूनही आधार कार्ड महत्त्वाचे आहे. देशातील जवळपास संपूर्ण प्रौढ लोकसंख्येकडे आधार कार्ड आहे. सरकारने आधार कार्ड देण्यासाठी एक संस्था स्थापन केली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) असं या संस्थेचं नाव आहे. UIDAI नागरिकांना ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही आधार कार्ड तयार करुन देण्याची सुविधा देते. आधार कार्डचे अनेक प्रकार आहेत.
आधार कार्डचे किती प्रकार आहेत आणि ते कसे मिळवायचे ते जाणून घेऊया. पीव्हीसी आधार कार्ड जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड क्रेडिट कार्ड सारखे बनवायचे असेल तर तुम्ही फक्त ५० रुपये खर्च करून पिव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करू शकता. यामध्ये अनेक प्रकारचे सुरक्षेचे तपशील नोंदवले जातात आणि यामध्ये सर्व नागरिकांचे चिन्ह ‘क्यूआर कोड’च्या स्वरूपात सुरक्षित ठेवावे लागते. हे कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला आधारच्या अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर जाऊन ऑर्डर द्यावी लागेल.
ऑर्डर दिल्यानंतर ५ ते ६ दिवसांत हे कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहोचते. mAadhaar कार्ड UIDAI ने आधार कार्ड धारकांच्या मदतीसाठी मोबाईल ऍप्लिकेशन तयार केले आहे. या ऍपद्वारे तुम्ही आधारची ई-कॉपी तुमच्या मोबाइलमध्ये सुरक्षितपणे सेव्ह करुन ठेवू शकता. हे ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
यासोबतच आधार अपडेट केल्यावर तुमच्या आधार mAadhaar कार्डमध्ये सेव्ह केलेले आधार कार्ड आपोआप अपडेट होईल. आधार पत्र जर तुमचे आधार कार्ड गहाळ झाले असेल आणि तुम्हाला ते आपत्कालीन परिस्थितीत डाउनलोड करावे लागले तर तुम्ही आधार पत्र डाउनलोड करू शकता. हे एक मोठे जाड आधार कार्ड असून त्यात नागरिकांची सर्व माहिती नोंदवली जाते. तुम्ही फक्त OTP द्वारे आधार पत्र डाउनलोड करू शकता.
ई-आधार कार्ड तुम्ही मोबाईलमध्ये ई-आधार कार्ड सहज डाउनलोड करू शकता. आधार डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी, UIDAI मास्क केलेले ई-आधार कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा प्रदान करते ज्यामध्ये फक्त शेवटचे चार क्रमांक नमूद केले आहेत. यामुळे तुमचा आधार डेटा चोरीला जाऊ शकत नाही असे प्रसिध्दी माध्यमांना कळवले आहे.