संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
मुंबई विमानतळावर कोकेनची तस्करी करणाऱ्या एका इथोपियन महिलेकडून तब्बल ५ कोटी रुपयांनचे कोकेन जप्त करण्यात कस्टम्सला यश आले आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिएरा लिओनियन नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई कस्टम्सने केली असून या महिलेकडून तब्बल ५०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. ती इथोपियाच्या आदिस अबाबा येथून प्रवास करत होती. ही महिला इथोपियन एअरलाईन क्रमांक ईटी ६१० या विमानातून मुंबईत दाखल झाली होती.
दरम्यान मुंबई विमानतळावर संबंधित महिलेच्या पर्सची तपासणी मुंबई विमानतळावरील
कस्टम्स अधिकाऱ्यांकडून करण्यात आली त्यावेळी तिच्या पर्समध्ये सुमारे ५०० ग्रॅम कोकेन आढळून आले. यानंतर कस्टम्सने या महिलेला ताब्यात घेऊन तिला जेरबंद करण्यात आले आहे.