संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
२२ मोबाईल व १० सायकल चोरी करणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून डोंबिवली पोलीसांनी २,९०,००० /- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. सविस्तर वृत्त असे आहे की गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हे आपल्या पोलीस ठाणे हददीत गस्त करत असताना दोन संशयीत लहान मुले हे पराग बंगल्यासमोरुन, नांदीवली रोड, डोंबिवली पूर्व येथून सायकल वरून जात असताना त्यांना मिळून आल्याने सदर दोघांना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच सदरची सायकल ही त्यांनी ९० फुट रोड, ठाकुर्ली पूर्व येथील वि-मार्ट समोरुन चोरी केल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडील रेडमी कंपनीच्या मोबाईल बाबत चौकशी केली असता सदरचा मोबाईल देखील चोरीचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सदर मोबाईल बाबत डोंबिवली पोलीस ठाणे गुरजिक्र :- १७७/२०२२ कलम :- ३८० भादंवि प्रमाणे व सायकल चोरी बाबत डोंबिवली पोलीस ठाणे गुरजिक्र २७९ / २०२२ कलम :- ३७९ भादवि प्रमाणे दाखल आहे.
दरम्यान, पोलीसांनी त्या विधीसंघर्षग्रस्त बालकांकडून सदरचा मुददेमाल जप्त केला. तसेच त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आणखी २१ मोबाईल व ९ सायकल चोरी केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्यांच्याकडून मेमोरंडम पंचनाम्या प्रमाने आयरेगांव परीसरातील एका घरातून एकूण २१ मोबाईल (ओपो, विवो, रेडमी, पोको) अशा कंपनीचे मोबाईल तसेच ९ सायकल (हिरो स्प्रींट, हरक्युलस, बिटविन, वोकी) अशा कंपनीच्या सायकल पोलिसांनी जप्त केल्या.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, कल्याण, सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि तडवी, पोनि सरडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा विशाल वाघ, पोहवा शंकर निवळे, पोहवा प्रशांत सरनाईक, पो.अ. वैजनाथ रावखंडे, नितीन सांगळे, पो.ना. कोती यांनी केली आहे.