फेरोज मणियार यांचा जयपूर येथे व्यक्तिविशेष उत्कृष्ट कार्य पत्रकारिता पुरस्काराने होणार सन्मान गौरव!
लोहा प्रतिनिधी: नांदेड जिल्ह्यातील लोहा येथून प्रथमच प्रकाशित होणारे दैनिक जनतेचे मत माझे मत वृत्तपत्राचे संपादक तथा जनतेचे मत युट्यूब चॅनल संचालक तरुण हुनहुनरी निर्भिड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे फेरोज मणियार यांना इंटरनॅशनल अच्युमेंट पुरस्कार जाहीर झाला आहे.
ग्रामीण भागातून सोशल इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपली एक ओळख निर्माण करणारे युट्युब चॅनेल च्या माध्यमातून जनसामान्याचे प्रश्न मांडणारे फिरोज मणियार उत्कृष्ट कार्याची दखल घेत व्यक्ती विशेष उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार राजस्थान येथील सुप्रसिद्ध फिल्म प्रोडक्शन अंबालिका शास्त्री यांचे शक्ती फिल्म प्रोडक्शनच्या वतीने दिला जाणारा इंटरनॅशनल अच्युवमेंट अवॉर्ड 2022 जयपुरचा बहुमान पुरस्कार लोहा शहरांचे भूमिपुत्र दैनिक जनतेचे मत माझे मतचे संपादक व नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध यूट्यूब न्यूज चैनलचे संचालक फेरोज मणियार यांना हा बहुमान राजस्थान जयपुर येथे दिनांक 30 सप्टेंबर रोजी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेत्री- अभिनेत्यांच्या हस्ते दिला जाणार आहे.
सदरील पुरस्कारासाठी नांदेड येथील पत्रकार नईम खान यांचे मार्गदर्शन लाभले असून मणियार यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे लोहा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. सोशल मीडिया व सर्व स्तरावरून फेरोज मणियार यांना अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.