मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: गुरुवार 23 फेब्रुवारी 2023 रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या उपस्थितीत मिरा-भाईंदर कला-क्रीडा महोत्सव 2023 चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (घ.क.व्य.) रवी पवार, उपायुक्त (क्रीडा) कल्पिता पिंपळे, महानगरपालिका अधिकारी, शालेय मुख्याध्यापक व स्पर्धेत भाग घेणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या दरम्यान आयुक्त यांनी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्त्व वाढावे, त्यांचा शारीरिक व सर्वांगीण विकास व्हावा यासाठी या कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
मिरा-भाईंदर कला क्रीडा महोत्सव अंतर्गत 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत विविध खेळ व सांस्कृतिक अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 23 फेब्रुवारी रोजी कबड्डी व लंगडी, 24 फेब्रुवारी रोजी खो-खो व लगोरी, 25 फेब्रुवारी रोजी धावणे व 26-27 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक स्पर्धा व खुला क्रिकेटचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त यांनी सांगितले.
मशाल प्रज्वलन करून स्पर्धेस उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांनी शुभेच्छा दिल्या व सदर कला-क्रीडा महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्या असे आवाहन आयुक्त यांनी केले आहे आहे.