जगदीश काशिकर, मुक्त पत्रकार, मुंबई : विश्व मराठी ऑनलाईन संमेलना निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषदेच्या वतीने सात मोफत लेखन कार्यशाळांचे आयोजन केले आहे.
विश्व मराठी परिषदेने जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन पहिल्या विश्र्व मराठी संमेलना निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपयुक्त विषयांवर सात ऑनलाईन लेखन कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. या संमेलना निमित्ताने नि:शुल्क ऑनलाईन कार्यशाळांचा हा अभिनव प्रयोग आहे. त्याचा लाभ जगभरातील नवोदित मराठी लेखकांनी घ्यावा असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.
या कार्यशाळा ऑनलाईन लाईव्ह पद्धतीने १० ते १६ डिसेंबर या दरम्यान भारतीय वेळेनुसार रोज सकाळी ९ वाजता सुरू होतील. यामध्ये भारताबाहेरील ३५ देशातील, अमेरिकेतील ५० राज्यातील आणि भारतातील महाराष्ट्रासह २५ राज्यातील मराठी भाषिकांना सहभागी होता येणार आहे.
कार्यशाळांचे विषय: १) यशस्वी लेखक – कॉपीराईट, आय एस बी इन, रॉयल्टी, लेखक-प्रकाशक करार, इ. ( १० डिसेंबर ) २) कादंबरी लेखन ( ११ डिसेंबर ) ३) संशोधन पद्धती व उपयोजन ( १२ डिसेंबर ) ४) अनुवाद कसा करावा ( १३ डिसेंबर ) ५) ब्लॉग लेखन ( १४ डिसेंबर ) ६) कथा लेखन ( १५ डिसेंबर ) ७) कविता लेखन ( १६ डिसेंबर )
या कार्यशाळांमध्ये भारत सासणे, लीना सोहोनी, डॉ. उमा कुलकर्णी, नीलिमा बोरवणकर, प्रा. क्षितिज पाटुकले, संजय सोनवणी, मोनिका गजेंद्रगडकर, डॉ. रेखा इनामदार-साने, अंजली कुलकर्णी, राजन लाखे, अँड. कल्याणी पाठक, भालचंद्र कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, व्यंकटेश कल्याणकर, इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळा मोफत आहेत. कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी www.vishwamarathiparishad.org/sammelan-nondani येथे नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क
दैदिप्य जोशी – समन्वयक – विश्र्व मराठी परिषद
मो.+९१ ९०२१७ ३२३३७
यांना संपर्क करावा. —- डाॅ. नितीन पवार, पुणे जिल्हा प्रतिनिधी,पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन 2121