Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

ठाणे शहराच्या आधुनिकीकरणात ठाण्यातील आर्किटेक्ट व इंटिरियर डिझायनरचे भरीव योगदान

संपादक:मोईन सय्यद/ठाणे प्रतिनिधी

ठाणे : इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स या सेवाभावी संस्थेच्या ठाणे चॅप्टरची म्हणजेच ठाणे, मुंबई ,नवी 9मुंबई शहरातील गृह तसेच कार्यालयांची सजावट करणाऱ्या आर्किटेक्टस, इंटिरियर डिजायनर्र्स, ट्रेड व या व्यवसायासंबंधित सभासद यांच्या पुढील दोन वर्षासाठी नियुक्ती केलेल्या कार्यकारिणीचा स्थापना समारंभ नुकताच ठाणे शहरात पार पडला.

तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख आता गगनचुंबी इमारती, मेट्रो, प्रशस्त मॉल्स, फ्लायओव्हर, तारांकित हॉटेल, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण संस्था अशी झाली असून या सर्व जडण घडणीत ठाण्यातील आर्किटेक्ट व इंटिरियर डिझायनर यांचा सिंहाचा वाटा आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनरच्या ठाणे चॅप्टरची सभा ठाण्यामध्ये झाली असून या संघटनेचे माजी चेयरमन व जेष्ठ आर्किटेक्ट श्री संजीव ठाकूर यांनी आढावा घेतला. गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. पेट्रोल डिझेलच्या भाववाढीचा बांधकाम क्षेत्राला सुद्धा मोठा फटका पडला आहे या सर्व आव्हानाचा सामना करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्सची ठाणे चॅप्टर ही संघटना नव्या चेहऱ्यांना घेऊन सज्ज झाली आहे.

यावेळी या संघटनेचे नवनियुक्त चेयरमन व जेष्ठ आर्किटेक्ट श्री संदीप नरेश जोशी म्हणाले, ” पुढील दोन वर्षांसाठी आम्ही कार्यकारणी जाहीर केली असून यामध्ये आमची संघटना आर्किटेक्चर व इंटिरिअर क्षेत्रात येणाऱ्या युवा पिढीकडे जाणार आहे कारण आमचे क्षेत्र हे क्रिएटिव्ह क्षेत्र असून आमच्या क्षेत्रातील ठाण्यातील दिग्गज आर्किटेक्ट्स या युवापिढीला योग्य मार्गदर्शन करू शकतील. म्हणूनच आम्ही संवाद या उपक्रमाचे आयोजन करणार आहोत. तसेच आर्किटेक्चर व इंटिरियर क्षेत्रातील व या व्यवसायामधील आमचे सहकारी आमचे प्रायोजक ईंटीरियर वस्तू बनविणारे कारखानदार यांच्या कारखान्यांना भेट देणार आहोत. याकरीता आम्ही विविध वर्कशॉप घेणार आहोत व तसेच पहिल्यांदा कल्चरल व स्पोर्टस कमिटीची स्थापना केलेली आहे, असे अनेक उपक्रम आम्ही येत्या दोन वर्षात राबविणार आहोत.

इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स ही राष्ट्रीय संस्था असून भारतातील सुमारे आठ हजार पाचशे आर्किटेक्टस, इंटिरियर डिजायनर्स, ट्रेड मेंबर्स हे यात सहभागी आहेत तसेच संपूर्ण भारतात ३३ चॅप्टर कार्यरत असून आर्किटेक्चर व इंटिरिअर डिजायनर्स च्या क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी ही संस्था प्रयत्नशील असते.”
या सभेचे ठळक वैशिष्ट म्हणजे या सभेला इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आर्किटेक्ट जबीन झकारियास खास कोचीवरून ठाण्यामध्ये आल्या होत्या. त्यांनी उपस्थित असलेल्या सर्व आर्किटेक्टना, डिजायनर्स व ट्रेड मेंबर्सना संबोधित व मार्गदर्शन करताना सांगितले, “भारतीय इंटिरियर डिझायनर्स संस्थेची स्थापना १९७२ साली झाली असून सदस्यांमध्ये चांगल्या व्यावसायिक आणि व्यापार पद्धती आणि नैतिकता स्थापित करण्यासाठी आणि इंटीरियर डिझाइन व्यवसायाची प्रतिमा ठळक करण्यासाठी झाली आहे तसेच परदेशातील तत्सम संस्थांशी माहितीची देवाणघेवाण या माध्यमातून आम्ही करीत आहोत.

ठाणे चॅप्टर हा एक देशातील महत्वाचा चॅप्टर असून येत्या काळात ठाणे शहर हे जागतिक पटलावर एक विकसित शहर म्हणून ओळखले जाणार आहे व यात ठाण्यातील आर्किटेक्ट व इंटिरियर डिझायनर्स यांची महत्वाची भूमिका राहणार आहे.” इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन इंटिरियर डिझायनर्स ठाणे चॅप्टरचे जनसंपर्क अधिकारी आर्किटेक्ट श्री श्रेयश आत्माराम सरमळकर यांनी वरील माहिती दिली आहे.

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *