Latest News आपलं शहर गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र

कल्याण गुन्हे शाखा घटक-३ ने शिताफीने आवळल्या अट्टल मोटर सायकल चोराच्या मुसक्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि.११.०१.२०२२ रोजी गुन्हे शाखा घटक ३ परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पो.कॉ.जरग यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक अनोळखी इसम कटाई नाका, कटाई गाव, डोंबिवली (पूर्व) येथे विना नंबर प्लेट असलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटर सायकलसह उभा आहे. अशी माहिती मिळाल्याने लागलीच सदर ठिकाणी स्टाफसह जाऊन खात्री केली असता बातमीस अनुसरून नमूद इसम मिळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आधारकार्ड वरील पत्ता: मनुबाई हाईट्स, बिल्डिंग न.२०२, कल्याण फाटा, ठाणे मुळगांव त्रिपुरा आसाम असे सांगितले. त्यास त्याच्या जवळ असलेली विना नंबर प्लेट असलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटर सायकल बाबत कागदपत्रे हजर करण्यास संगितले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून त्यास मोटर सायकलसह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे सदर मोटरसायकली बाबत विश्वासात घेऊन विचारपूस करता त्याने सदर मोटर सायकल राबोडी ठाणे परिसरातून चोरी केलेली असल्याबाबत सांगितले. त्याबाबत राबोडी पोलीस ठाणे येथे खात्री करता सदर मोटर सायकल चोरीस गेल्याबाबत गुन्हा रजि.नं. १०/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याबाबत खात्री झाली. त्यामुळे त्याच्याकडून मोटारसायकल नंबर एमएच ०४ / केबी ११७० व त्याच्या अंगझडती मध्ये मिळालेला मोबाईल फोन असा एकूण ५०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तसेच नमूद आरोपी इसमाकडे अधिक तपास करता त्याने कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन महिन्यांपूर्वी एक मोटरसायकल चोरी केलेली असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने तपास करून कासारवडवली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३८१/२०२१ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे चोरीस गेलेली २०,०००/- रुपये किंमतीची हिरो आय ३ कंपनीची काळ्या निळ्या सिव्हर रंगाची मोटरसायकल नंबर एमएच ०२ / डीटी ९७४९ ही देखील त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे.

अश्या प्रकारे गुन्हे शाखा घटक-३ कल्याण यांनी १) राबोडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १०/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे व २) कासारवडवली पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ३८१/२०२१ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे असे दोन गुन्हे उघडकीस आणून एकूण ७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच संबंधित आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपास कामी मिळू आलेल्या मुद्देमालासह राबोडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.

प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पोलीस निरीक्षक श्री.किशोर शिरसाठ, सपोनि भूषण एम.दायमा, पोउनि मोहन कळमकर, पोउनि कवडे, सपोउनि माळी, पोहवा माने, पोहवा जाधव, पोना पोटे, पोकॉ जरग, पोकॉ ईशी यांनी केलेली आहे.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *