Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

नरवीर तानाजी – सुर्याजी मालुसरेंच्या साखर गावात शिवजन्मोत्सव साजरा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवरायांच्या शौर्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या पोलादपूर तालुक्यातील सुभेदार नरवीर तानाजी आणि सूर्याजी मालुसरे यांचे वंशज असलेल्या साखर गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात स्वराज्य युवा प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. उमरठ येथील सुभेदार तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधी स्थळावरुन साखर येथील सूर्याजी मालुसरे यांच्या समाधी पर्यंत शेकडो तरुणांच्या उपस्थितीत पहाटे शिवज्योत आणण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार आणि कीर्तनकार हभप डॉ. प्रविण महाराज दुशिंग पाटील (औरंगाबाद) यांचे शिवकार्याचा वेध घेणारे वीररसपूर्ण कीर्तन झाले. आजची तरुण पिढी बिघडलीय अशी खंत अलीकडे समाजात व्यक्त केली जाते, परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साजरी होणारी शिवजयंती तरुणच साजरी करतात, त्याचबरोबर देशाची सीमांचे सरंक्षण करणारे तरुणच आहेत. मात्र आई वडिल संस्कार करण्यात कमी पडत आहेत. शिक्षण घेण्याच्या अन देण्याच्या पध्दतीत बदल झाला असला तरी महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासाचे बाळकडू त्यांना सतत पाजत जा. असे आवाहन कीर्तनातून डॉ. प्रविण महाराजांनी केले. किर्तनास सुप्रसिद्ध स्वरगंधर्व कैलास महाराज पवार, गायन सम्राट संजय महाराज हजारे, रायगड भूषण पखवाज वादक सुनिल मेस्त्री, विठ्ठल मांढरे, जयराम चोरगे, अनिल दाभेकर, आनंद घाडगे यांनी साथ दिली. याप्रसंगी श्री सद्गगुरू भावे महाराज वारकरी समाजाचे गुरुवर्य हभप रामदादा घाडगे, पोलादपूर तालुक्याचे माजी सभापती नारायण अहिरे, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेश कोळसकर या मान्यवरचा विशेष सत्कार करण्यात आला.

व्यासपीठावर पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते ज्ञानोबा मालुसरे, विनायक मालुसरे, सरपंच पांडुरंग सुतार, प्रमुख संयोजक पांडुरंग शं. मालूसरे, विनायक ज. बांद्रे, पोलादपूर शिवसेना नेते आणि ज्येष्ठ सामाजिक नेते कृष्णा कदम, भरत चोरगे, दीपेश मालुसरे, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयराम बांद्रे, दगडू शं. मालुसरे, संतोष तु. मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र मालुसरे, सुनिल बांद्रे, नारायण चोरगे, रूपेश सोनाटे, संदीप मालुसरे, राकेश चोरगे, नितेश ल. मालुसरे, वैभव सोनाटे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पोलादपूर शिवसेना तालुका प्रमुख अनिल मालुसरे तर सूत्रसंचालन नारायण चोरगे गुरुजी यांनी केले. पोलादपूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील शेकडो नागरिक आणि शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.

 

Share :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *